

Spraying of cotton crops accelerated as rains provide relief
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा अंबड तालुक्यातील सुखापुरीसह परिसरात अंतर मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसत आहे. तीन दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने फवारणीच्या कामांना वेग आला असून शेतात मजूर मिळत नसल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार एंट्री मारली होती त्यामुळे शेतातील पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी व मजूर शेतात राबत आहे. परिसरात कपाशी, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
सततच्या पावसाने शेतात वापसा होत नसल्याने शेतातील पिकामध्ये गवत वाढले आहे. तर कपाशी, सोयाबीन, तुरीसह उत्तर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे शेतकरी शेतामध्ये कपाशी व इतर पेपर फवारणीची लगबग करताना दिसत आहेत. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर थ्रिप्स, तुडतुडे, मावा, कीटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधी फवारणी मोठ्या प्रमाणात करत आहेत.