jalna news : अब दौडेगा जालना मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

फन रनर्स व रोट्रॅक्ट क्लबचे आयोजन; दोन हजार धावपटूंचा सहभाग
jalna news
jalna news : अब दौडेगा जालना मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसादfile photo
Published on
Updated on

Spontaneous response to Ab Daudega Jalna Marathon

जालना, पुढारी वृत्तसेवाः सुदृढ व देण्याच्या उद्देशाने येथील फन रनर्स रोट्रॅक्ट क्लब तर्फे रविवारी (दि. ०१) आयोजित फन रनर्स रोट्रॅक्ट मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल दोन हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला. 'अब दौडेगा जालना' या संकल्पनेखाली आयोजित या मॅरेथॉनमुळे संपूर्ण शहरात आरोग्य, उत्साह व सामाजिक सहभागाचे वातावरण निर्माण झाले.

jalna news
शोकसभेत चंद्रकांत दानवे यांना अश्रू अनावर

मंठा चौफुली परिसरातील रॉयल रीजेन्सी येथून सकाळी ६.३० वाजता स्पर्धेचा शुभारंभ झाला. जालना शहर महापालीका जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे, आमदार अर्जुनराव खोतकर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस झुंबा, योग आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रारंभकरण्यात आला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतानंतर शुभम अकॅडमीच्या वतीने सामूहिक झुंबा नृत्य व योगासने घेण्यात आली. संपूर्ण स्पर्धा मार्गावर ढोल-ताशे व वाद्यवृंदांच्या गजरामुळे उत्साही वातावरण निर्माण झाले.

धावपटूंसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल, फळे, ज्यूस यांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय भावेशभाई पटेल यांच्यावतीने अॅम्ब्युलन्स सेवा, तसेच फिजिओथेरपी व आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते.

jalna news
Jalna News : थकीत १०२ कोटींच्या करवसुलीसाठी जप्ती मोहीम !

स्पर्धेदरम्यान पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण ठेवत चोख बंदोवस्त केला. या मॅरेथॉनमध्ये मराठवाड्यासह पुणे, मुंबई व हैदराबाद येथील धावपटूंनी सहभाग नोंदवला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच चिमुकल्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा विविध अंतरांत तसेच वेगवेगळ्या वयोगटांनुसार स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमासाठी राजेशजी सोनी (टायटल प्रायोजक), जगदीश राठी (आयकॉन स्टील), नितीन काबरा (पोलाद स्टील), प्रीतेश भारुका (उमा स्टील), मधु राठी (रायबा क्लॉथ), अरुण अग्रवाल (कालिका स्टील), नमन भाला (मेटारोल स्टील), महेंद्र देशपांडे, दुर्गेश अग्रवाल, रामनिवास मानधानी (वरद फर्टिलायझर) यांनी सहकार्य केले.

स्पर्धकांचे मनोबल वाढवले

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फनरनर्स व रोट्रॅक्ट क्लब ऑफ जालनाचे सर्व सदस्य व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. दिव्या एस.आर.जे. आणि तारा बिल्डकॉन यांच्या वतीने डीजे व पाण्याच्या स्टॉलची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news