Jalna News : थकीत १०२ कोटींच्या करवसुलीसाठी जप्ती मोहीम !

महापालिकेकडून पाच पथके स्थापन; कर भरण्याचे प्रशासनाचे आवाहन
Jalna News
Jalna News : मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक मनपा निवडणूकFile Photo
Published on
Updated on

Seizure campaign launched to recover outstanding taxes of Rs. 102 crore!

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महापालीकेने मार्च महिन्यापुर्वी थकीत १०२ कोटी रुपयांच्या कर वसुलीसाठी कंबर कसली आहे. थकीत कर वसुलीच्या पार्श्वभुमीवर मालमत्ता जप्तीसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताध-ारकांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. मार्चपुर्वी थकीत कराची ८० टक्यांची वसुली करण्याचा महापालीकेचा प्रयत्न आहे.

Jalna News
ट्रक-ट्रॅक्टर अन् दुचाकीचा तिहेरी अपघात

जालना महापालीकेच्या थकीत कर वसुलीच्या पार्श्वभुमीवर शनिवारी जिल्हाधिकारी तथा आयुक्त अशिमा मित्तल यांनी कर वसुलीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या. जे मालमत्ता धारक त्यांच्याकडे असलेली जप्तीसाठी थकबाकी जमा करणार नाहीत, त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले आहेत.

मालमत्ता महापालीकेच्यावतीने पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभय योजने अंतर्गत शास्तीमध्ये (दंड) ५०% सूट देण्यास २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभघेऊन कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील रस्ते, नाली, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारखी विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कराची वसुली होणे अत्यंत आवश्यक असल्याने कर वसुलीसाठी महापालीका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहे.

Jalna News
शोकसभेत चंद्रकांत दानवे यांना अश्रू अनावर

मार्चपर्यंत ८० कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट महापालीकेच्यावतीने ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी महापालीकेची २० ते २२ कोटी रुपयांची कर वसुली झाली होती. यावर्षी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चपर्यंत किती कर वसुली होणार हे आगामी काळात समजणार आहे.

कर भरून सहकार्य करावे

जिल्हाधिकारी तथा आयुक्त अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, कर अधिकारी राहुल देशमुख यांच्यासह कर निरीक्षक व वसुली लिपीक उपस्थित होते. जालना 75 शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी त्वरित भरून शहराच्या विकासकामांत सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news