

Speeding car hits bike, one killed
वाटुर फाटा, पुढारी वृत्तसेवाः परतुर तालुक्यातील वाटुर फाटा ते मंठा रोडवर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या भिषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.
वाटर येथील करण गणेशराव खंडागळे (२०) हा युवक जेवणाचा डब्बा आणण्याकरीता जात असताना त्याच्या दुचाकीला पाठीमागुन भरधाव कार (क्रमांक एम. एच. ०४-३. एफ. ६८४०) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात मंठा तालुक्यातील कंठाळा खुर्द येथील दुचाकी चालक करण गणेशराव खंडागळे हा युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाल्याची माहीती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
या प्रकरणी कार चालका विरुद्ध परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास परतुर पोलीस करत आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती.