

Speeding car crosses divider and overturns; three injured
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन खड्यात पलटी झाल्याची घटना धुळे सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री जवळ मंगळवार, दि. १२ रोजी रात्री १०:३० वाजता घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.
आशुतोष दिलीप जाधव २५, केदार संजय पठाडे २८ व ओम बाळासाहेब चव्हाण २३ तिघेही रा.टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर असे जखमींची नावे आहे. छत्रपती संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक एम एच २० सी एच ०९७३ ही भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार दुभाजक ओलांडून पलटी झाली. या अपघातात कार मधील दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहे.