Jalna Accident : कार-छोटा हत्ती भीषण अपघात; 1 ठार, दोघे जखमी

अपघातानंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी बोलेरो चालकासह दोघांना पकडून चांगलाच चोप दिला.
Jalna Accident
कार-छोटा हत्ती भीषण अपघात; 1 ठार, दोघे जखमीFile Photo
Published on
Updated on

जालना : जालना-देऊळगाव राजा रोडवरील वाघरुळ शिवारात शुक्रवार, 1 मे रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुरलीधर लाहोरे (54, रा. देऊळगाव राजा) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 मे रोजी दुपारच्या सुमारास वाघरुळ शिवारात भरधाव वेगाने आलेल्या डाक पार्सलच्या बोलेरो गाडीने छोटा हत्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, छोटा हत्ती गाडीने चक्क दोन पलट्या मारल्या; तर बोलेरो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली.

Jalna Accident
Nanded Accident | हदगाव–तामसा मार्गावर कारची दुचाकीला धडक: चौघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

यावेळी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या काही नागरिकांची मोठी धावपळ उडाली. सुदैवाने हॉटेलमधील इतर कोणाला इजा झाली नाही, मात्र या थरारक अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.

Jalna Accident
Washim accident | मेडशी बायपासवर भीषण अपघात; 10 महिला मजूर जखमी...

छोटा हत्ती (एमएच 28, बीबी 1813) हे वाहन देऊळगाव राजाकडून जालन्याकडे येत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डाक पार्सल बोलेरोने (एमपी 09, एजी 8952) या वाहनाला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

नागरिकांनी दिला चोप

अपघातानंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी बोलेरो चालकासह दोघांना पकडून चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना वाहनाबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news