

भोकरदन : भोकरदन- जालना रोडवरील कुंभारी पाटी जवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघात सुटीवर आलेल्या जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील बोरगाव जहांगीर येथील अमोल पंडित दळवी वय 35 वर्ष हा भारतीय स्थलसेनेतील जवान आठ दिवसांपूर्वी सुटीवर घरी आला होता गुरुवार सात ऑगस्ट रोजी रात्री दळवी हा नायरा पेट्रोल पंपा शेजारील हॉटेल मधून दुचाकीवर बाहेर येऊन मुख्य रस्त्यावर आला असता जालना कडून येणाऱ्या आयशर गाडीने दळवी यांच्या दुचाकीला ठोस दिली त्यामध्ये अमोल दळवी हे जागीच ठार झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यापूर्वी काही नागरिकांनी दळवी याना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर नी त्यांना मयत घोषित केले या प्रकरणात रात्री उशिरा पर्यन्त गुन्हा दाखल झाला नव्हता, अपघात ठार झालेल्या अमोल दळवी यांच्या पश्चात आई, पत्नी, व एक सात वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.