

Snails attack crops; crop loss
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील हिसोडासह परिसरात कमी पाऊस रोगराई बाजार भावातील चढ-उतार या संकटांनी आधीच हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता गोगलगायींच्या वाढत्या प्रादुर्भावाचे नवे संकट उभे टाकले आहे. विशेषतः भाजीपाला पिकांवर या मृदुकाय प्राणी जबर ताव मारत असून उगवलेली रोपे कोवळी पाने कड्या कुडतडून टाकत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याच्या मार्गावर आहे.
यावर्षीचा पाऊस काही भागांत सतत असल्याने या प्रजातीचा प्रादुर्भाव भोकरदन तालुक्यातील लिहा, शेलुद, कोटा कोली, जळगाव सपकाळ आदी भागात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रात्रीच्या वेळेस बाहेर पडणाऱ्या या गोगलगायी शेत पिके फसत करीत असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. गोगलगायिनी टोमॅटो, वांगी, भोपळा, पालेभाज्या व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. उगवणीच्या अवस्थेतील झाडांवर ताव मारते.
कुरतडल्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो व झाडांची वाढ खुंटते. काही झाडे तर पूर्णपणे सुकून जात आहे. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पाहणीत काही शेतांमध्ये पन्नास टक्के येऊन अधिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. गोगलगायींच्या लाळे मुळे बुरशीजन्य रोगही पसरत आहे. काय शेतकरी गोगलगायी वेचून खड्ड्यात टाकून नष्ट करत आहेत.
काही मीठ टाकून नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे. मात्र सुपीकता कमी होण्याच्या भीतीने अनेक शेतकरी ही पद्धत वापरण्यास शासन आहेत. त्यामुळे कृषी विभागाने गोगलगायींच्या नियंत्रणासाठी उपाय सुचवावेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आधी शेतकऱ्यांनी केली आहे.