

Short circuit burns 5 acres of sugarcane in Bodkha
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :
घनसावंगी तालुक्यातील बोडखा बु. येथील केशव शिवाजी ढेरे आणि कालिंदा शिवाजी ढेरे यांच्या गट नं.१९७ मधील ५ एकर असणाऱ्या उसाच्या शेतात आज सकाळी अचानकपणे महावितरणच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून अंदाजे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घनसावंगी तालुक्यातील बोडखा बु. येथील केशव शिवाजी ढेरे आणि कालिंदा शिवाजी ढेरे यांच्या गट नं. १९७ मधील ५ एकर असणारा ऊस महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे काही क्षणात जळून खाक झाला आहे. महावितरण कंपनीची शेतातुन गेलेल्या विजवाहिणीची तार सोमवार सकाळी अचानकपणे झालेल्या शॉर्ट सर्किटने काढणीस आलेल्या उसाला मोठ्या प्रमाणात आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र या आगीत ५ एकर ऊस जळाल्याने सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतात विजेच्या ताराकडे लाईनमन तसेच अधिकारी दुर्लक्ष करत असल्यानेच अशा दुर्घटना होत आहेत. मात्र आज अचानक तार तुटून शॉर्ट सर्किटने आग लागल्याने नुकसान झाले आहे.