

शहागड : अबंड तालुक्यातील सोमवारी 8 डिसेंबर रोजी पाच वाजेच्या सुमारास डावरगाव शिवारातून शेतातून कारखान्यांकडून ऊस वाहतूक करीत होते. डावरगाव शिवारात चढ-उतार आसल्याने एक उसाची ट्रॉली भरलेली अबंड राज्य महामार्गावर घेऊन जात होते. तर दुसरी ट्रॉली जोडत असतांना ट्रक क्र. एम.एच.50.0601 याने ट्राॅलीला जोराची धडक दिली.
यात सापडून पिता परमेश्वर गंगाभिषण धुपे वय 48 यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गौरव परमेश्वर धुपे 22 वर्ष गंभीर जखमी झाला. जखमीस जालना उपजिल्हा रुग्णालय हालवण्यात आलेले असून, मयत परमेश्वर धुपे यांच्यावर अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात दोन मुले, चार भाऊ ,पत्नी, नातवंडे सुना सा मोठा परिवार आहे .या घटनेमुळे डावरगावात हळ-हळ व्यक्त करण्यात येत आहे.