

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील तालुक्यातील शेलुद येथील धामणा मध्यम प्रकल्पात यंदा पाण्याची अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणात केवळ ८.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला असून, येणाऱ्या काही दिवसांत शेलुद व परिसरातील गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
शेलुद अंतर्गत येणाऱ्या या धरणाची ही टक्केवारी ८.१८ टक्के इतकी आहे. आजचा बिगर सिंचन पाणी मागील वर्षी याच दिवशी या धरणात ५.८०३ दलघमी उपयुक्त साठा म्हणजेच १०० टक्के पाणी होते. त्या तुलनेत यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने धरण जवळपास एकदमच कमी झाले आहे.
या धरणातून शेलुद सह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच शेतीसाठी देखील याच पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तरी जून पासून आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे. जर पुढील पंधरा दिवसात जोरदार पाऊस झाला नाही, तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडणार असून प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेलुद धामणा धरणामध्ये दहा ते बारा गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र धरणामध्ये आता आठच टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
पी. एम. हुडेकर, कालवा निरीक्षक