Shahagad donkey market : शहागड गावात गाढवांचा बाजार

वीटभट्ट्यांसाठी मेहनती जनावरांची मोठी मागणी
Shahagad donkey market
शहागडः तालुक्यातील शहागड येथे बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात गाढवे दाखल होत आहे.pudhari photo
Published on
Updated on

शहागड : अबंड तालुक्यातील शहागड येथे मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहुन गाढवे विक्रीसाठी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध कामांसाठी या मेहनती जनावरांची मागणी वाढली आहे.

प्राचीन काळापासून गाढवांचा उपयोग विविध कामांसाठी होत आला आहे. नदीतून पाणी वाहून नेणे, कुंभारांच्या चाकाला फिरवणे, तेलबियांचा घाणा चालवणे, लाकडी रसवंती फिरवणे अशा विविध कामांत गाढवांचा सहभाग असतो. 21व्या शतकातील आधुनिक युगातही हे जनावर माणसाच्या उपयोगी पडताना दिसत आहे.

अंबड तालुक्यातील शहागड गावासह गोंदी, पाथरवाला, कुरण रोड तसेच पैठण, साष्टपिंपळगाव रोड, साष्टपिंपळगाव,गोरी-गंधारी, डोमलगाव परिसरात शंभरच्या वर वीट भट्ट्या असून त्यावर मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे वीटभट्टी मालक गाढवांचा आधार घेत आहेत. वीटभट्टीतून ट्रॅक्टर व ट्रकपर्यंत पोहचविण्यासाठी गाढवे प्रभावीपणे काम करत आहेत.

Shahagad donkey market
Jalna Municipal Corporation : स्वीकृत सदस्य निवड, दोन उमेदवार अपात्र

मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश येथून मजूर आणले जात असले तरी अपेक्षित प्रमाणात काम होत नसल्याचे दिसत आहे. काही मजूर मध्येच काम सोडून जात असल्याने वीटभट्टी चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, गाढवांचा वापर अधिक वाढला आहे.

गाढव सांभाळणाऱ्या इसमाकडे साधारण 20 ते 30 लहान-मोठी गाढवे आहेत. दररोज एका गाढवापासून 300 ते 400 रुपये एवढी कमाई गाढवांच्या मालकांना होत आहे. शहागड परिसरात ताजा चारा व पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने गाढवांसाठी हा भाग अनुकूल ठरत आहे. गाढवांची विष्ठा वीटभट्ट्यांमध्ये गाईच्या शेणाप्रमाणे जळतन म्हणूनही वापरली जाते. लहान मुलांना ताप आल्यास गाढवणीचे दूध देण्याची परंपरा आढळते. तीन ते चार मालकांकडे मिळून मोठ्या प्रमाणात गाढवे शहागड येथे दाखल झाली आहेत.

Shahagad donkey market
Chatrapati Sambhajinagar : मनपा निवडणुकीचा खर्च 15 दिवसांत सादर करा

असे आहेत भाव

गाढवाचे 6 महिने ते 1 वर्षाचे पिल्लू 8 हजार रुपयांना तर कामासाठीचे प्रौढ गाढवे 18 ते 35 हजारांना विक्री होत आहे. चांगल्या गाढवास 35 ते 50 हजारांपर्यंत भाव मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news