

Selling rice on the black market
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील व ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला स्वस्त धान्य मिळावे, यासाठी राज्य व केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून वाटप सुरु केले आहे. तालुक्यातील वितरित होणारे गहू, तांदूळ व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचे चित्र तालुक्यातील प्रत्येक गावात नजरेस पडत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात रेशन दुकानंदाराशी व्यापाऱ्यांचे संबंध असून लाभार्थ्यांच्या त्यांच्या घरात जाणारे स्वस्त धान्य व्यापाऱ्याच्या घशात जात आहे. भर दिवसा ढवळ्या या स्वस्त धान्याची वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने होते हे एक न उलघडणारे कोडे आहे. तालुक्यातील अनेक दुकानावर भावफलक लावण्यात आले नसून वेळ ही निश्चित कारण्यात आली नाही. तालुक्यात स्वस्त धान्यांची ११२ दुकाने असून एकूण कार्ड संख्या ३८ हजार ३८३ असून, लाभार्थी संख्या १ लाख ६४ हजार ६२७ एवढी आहे. रेशन वाटप झाल्यावर गावोगावी व्यापारी फिरून गहू, तांदूळ खरेदी करताना दिसत आहे.
जाफराबाद तालुक्यात ऑक्टोंबर महिन्यात तांदळ ४ हजार २८३ क्विंटल, ज्वारी १ हजार ४४० क्विंटल आणि गहू १ हजार ४६२ क्विंटल पुरवठा करण्यात येतो. या पुरवढ्यात दर महिन्यात आकडे बदलतात.