१०७ हरवलेल्या महिलांचा शोध; ८ मुली सुरक्षित

ही मोहीम ६ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत मा. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.
jalna news
१०७ हरवलेल्या महिलांचा शोध; ८ मुली सुरक्षितfile photo
Published on
Updated on

Search for 107 Missing Women; 8 Girls Safe

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना पोलिसांनी राबवलेल्या 'ऑपरेशन शोध-३' मोहिमेत हरवलेल्या १०७महिलांचा शोध लावला असून ८ पीडित मुलींना विविध शहरांतून सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे. ही मोहीम ६ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत मा. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.

jalna news
Beed Crime | पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका : आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या विशेष मोहिमेदरम्यान २०२१ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हरवलेल्या सुमारे २०० महिलांपैकी तब्बल १०७ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तपास पथकांनी विविध जिल्हे व राज्यांत शोधमोहीम राबवत हरवलेल्या महिलांचा ठावठिकाणा लावला. तसेच विविध गुन्ह्यांमध्ये पीडित असलेल्या ८ मुलींना शोधून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल तसेच विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी समन्वयाने काम केले. तांत्रिक साधनांचा वापर,गोपनीय माहितीचे जाळे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली.

jalna news
kidnapping case | नांदेडहून अपहरण : 17 वर्षीय मुलगी परभणी रेल्वे स्थानकावर आढळली

जालना या पोलिसांच्या कामगिरीमुळे हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी प्रशासनाची तत्परता अध-ोरेखित झाली आहे. नागरिकांच्या सुर-क्षेसाठी पोलिस दल सदैव कटिबद्ध असून अशा मोहिमा पुढेही राबविल्या जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news