

Sant Muktabai Palkhi 2025
शहागड : अंबड येथे मंगळवारी (दि. १७) मुक्कामी असलेली संत श्री. मुक्ताबाई पालखीचे आज सकाळी अंबड येथून प्रस्थान झाले. पालखीत १८०० वारकरी महिला -पुरुष, तरुण, तरुणी, वयोवृद्ध वारकरी सहभागी झाले आहेत. संत श्री. मुक्ताई संस्थांचे वारकरी या दिंडी सोहळ्याचा अनुभव घेत आहेत. विविध ठिकाणी पालखीचे स्वागत करून नागरिक संत श्री. मुक्ताई पालखीचे दर्शन घेत आहे.
वडीगोद्री येथील संत श्री गुरुदेव आश्रम येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. शहागड येथे गुरूवारी दहा वाजेपर्यंत पालखी गेवराईकडे प्रस्थान करेल, यासाठी नागरिकांनी चहा नाश्ता व रांगोळी सडा-सारवण यांची व्यवस्था केलेली आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड-घनसावंगी, तिर्थपुरी, शहागड मार्गावर ३० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जमादार गोपाल दिलवाले गोपनीय शाखेचे सचिन साळवे, संतोष डोईफोडे, अंकुश पठाडे, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर कटुंले, फुलचंद हाजारे, रामदास केंद्रे, दीपक भोजने, शाकेर सिद्दीकी, प्रदीप हावाळे, महिला पोलिस मीरा मुसळे, श्रीमती आद्रट, हायवे ट्राफिकेचे बघाटे, राठोड हे दिंडी सोबत बंदोबस्तासाठी तैनात आहेत.