Jalna Safed Musli farming profitable income|जिल्ह्यात 'सफेद मुसळी'ची यशस्वी शेती, शेतकऱ्यांना मिळाले एकरी अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न

जालनाः जिल्ह्यात प्रायोगिक व व्यावसायिक तत्त्वावर लागवड केलेल्या सफेद मुसळीची काढणी करताना शेतकरी.
 'सफेद मुसळी'ची शेती
'सफेद मुसळी'ची शेती
Published on: 
Updated on: 

जालना, पुढारी वृत्तसेवा: पारंपरिक शेतीला फाटा देत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी औषधी वनस्पती असलेल्या 'सफेद मुसळी'च्या लागवडीतून आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग निवडला आहे. कृषी विभागाच्या 'आत्मा' यंत्रणेच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या संकल्पनेतून व आत्मा विभागाचे, प्रकल्प संचालक अमोल आगवण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मुसळी पिकाची लागवड केली होती. सद्यस्थितीत या पिकाची काढणी सुरू असून, चांगल्या उत्पादनासह बाजारात मिळणाऱ्या आकर्षक दरामुळे शेतकऱ्यांना एकरी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

जिल्ह्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक तत्त्वावर झालेल्या या लागवडीतून बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे भरघोस उत्पादन मिळाले आहे. सध्या बाजारपेठेत वाळलेल्या सफेद मुसळीला १,२०० ते १,५०० रुपये प्रति किलो असा उत्तम दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या यशस्वी प्रयोगामागे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात 'आत्मा'चा मोठा वाटा आहे. 'पीक प्रात्यक्षिक' या घटकांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सफेद मुसळीची लागवड करून घेण्यात आली. केवळ बियाणे उपलब्ध करून न देता, शेतकऱ्यांना लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि काढणीपश्चात व्यवस्थापन याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, या पिकाची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष अभ्यास दौऱ्यांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचा थेट फायदा आज उत्पादनाच्या रूपाने दिसून येत आहे.

सफेद मुसळीच्या लागवडीमध्ये कंद बियाण्याचा खर्च सर्वाधिक असतो आणि त्यासाठी बाहेरच्या राज्यांवर अवलंबून राहावे लागते. यशस्वी उत्पादनामुळे पुढील हंगामासाठी जिल्ह्यातच दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार आहे.

 'सफेद मुसळी'ची शेती
जालना बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

एक एकर क्षेत्रात लागवड केली

आहे. खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न झाले आहे. या वर्षी कमी पाऊस असून देखील 13 क्विंटलचे उत्पन्न झाले आहे. पुढील वर्षासाठी 4 क्विंटल बियाणे ठेवले आहे. उर्वरित सफेद मुसळी ही वाळवून १२०० ते १५०० रु प्रति किलो प्रमाणे विक्री केली आहे.

- गणेश कोथळकर, शेतकरी वालसावंगी

 'सफेद मुसळी'ची शेती
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.