Jalna Crime News : आरटीओच्या वायुवेग पथकाला भररस्त्यात अडवून मारहाण

चलन मशीन हिसकावून अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी
Jalna Crime News
Jalna Crime News : आरटीओच्या वायुवेग पथकाला भररस्त्यात अडवून मारहाणFile Photo
Published on
Updated on

RTO's speed limit team was stopped and beaten on the road

जालना, पुढारी वृत्तसेवाः अतिभार वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून ४८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायुवेग पथकाला भररस्त्यात अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करुन मारहाण करीत चलन मशीन हिसकावून नेण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार जालन्यात घडला. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime News
Urea Black Marketing Exposed | कुंभार पिंपळगावात युरियाचा काळाबाजार उघड

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन निरीक्षक निलेश सुरेश अहिरे, सहकारी निरीक्षक कल्पेश सूर्यवंशी आणि शासकीय वाहनचालक भगवान पारीस्कर हे ३ जुलै रोजी सायंकाळी वाहन तपासणी मोहिमेवर होते. त्रिमूर्ती चौक परिसरात एमएच-४३-बीपी-१५१७ क्रमांकाचा ट्रक अतिभार असल्याचे आढळून आला.

वाहनाची क्षमता १५ हजार ७०० किलो असताना तब्बल १३ हजार ७० किलो अधिक माल आढळल्याने तसेच वाहनकर थकीत असल्याने संबंधित वाहनावर ४८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यानंतर वायुवेग पथक समृद्धी महामार्गाच्या दिशेने जात असताना एखंडे पेट्रोलपंपाजवळ एका एस-क्रॉस कारने शासकीय वाहनाचा रस्ता अडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कारमधून उतरलेल्या व्यक्तीने दंडाची कारवाई का केली, असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर मोटार वाहन निरीक्षकांच्या हातातील चलन मशीन हिसकावून घेतला.

Jalna Crime News
Parbhani Bribe Case : पाथरीत खळबळ, ८ हजारांची लाच घेताना 'भूमी अभिलेख'चा कर्मचारी रंगेहात जेरबंद

अंगावर कार घातली

आरोपीने चलन मशीन घेऊन जाण्याचा प्रयत्न करतांना अधिकाऱ्यांच्या अंगावर कार घातल्याचा आरोप आहे. फिर्यादीला खोट्या प्रकरणात अडकविण्याची आणि कुटुंबाचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यानंतर इंद्रायणी चौकात पुन्हा शासकीय वाहन अडवून धमकावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण, धमकी व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news