Loan waiver scheme : कर्जमाफी अंमलबजावणीचा गावात जाऊन आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांशी थेट संवाद
Loan waiver scheme
Loan waiver scheme : कर्जमाफी अंमलबजावणीचा गावात जाऊन आढावाfile photo
Published on
Updated on

Reviewing the implementation of the loan waiver by visiting the village

अंबड, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंबड तालुक्यातील गहिनीनाथ नगर येथे विशेष आढावा बैठक व शेतकरी संवाद पार पडला.

Loan waiver scheme
Shri Gajanan Maharaj Palkhi : शहापुरात श्री गजानन महाराज पालखीचे आज आगमन

माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपा नेते सतीश घाटगे पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना येत असलेल्या अडचणी व प्रश्न जाणून घेतले.

यावेळी सुनील राणे यांनी लाभार्थी शेतकरी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कर्जमाफी योजनेची सद्यस्थिती, लाभ वितरणाची प्रक्रिया, शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी तसेच केवायसी (KYC) प्रक्रियेसंदर्भातील प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व अडचणी व समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्या तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन सुनील राणे यांनी यावेळी दिले. तसेच भाजपा नेते सतीश घाटगे यांनी देखील बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे आणि झिरो आयटीआरमुळे शेतकरी कसे कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, याची अभ्यासपूर्ण माहिती सुनील राणे यांना दिली.

Loan waiver scheme
Godavari River : कोरडे पडलेले गोदावरीचे पात्र भरले

या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी किरण पाटील, भाजपचे मराठवाडा समन्वयक नितीन काळे, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस गोविंद ढेंबरे, तालुकाध्यक्ष शिवाजी मोरे, जीवनराव वगरे, बाळासाहेब बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकर लहामगे, सरपंच पांडुरंग खटके, अनिरुद्ध झिंजुर्डे, प्रेमानंद उढाण, भगवान बर्वे, चंद्रकांत बांगर, रामेश्वर माने, राजेंद्र छल्लारे यांच्यासह स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना मिळणार

शेतकऱ्यांपर्यंत वेळेत, पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे पोहोचावा तसेच कोणताही पात्र शेतकरी यापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीतील त्रुटी व अडचणी तातडीने दूर करण्यासाठी अंबड व घनसावंगी येथील भाजपा जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश घाटगे यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news