Jalna News : महसूलकडून ६० लाखांच्या मुद्देमालासह दोन हायवा जप्त

अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून छुप्या मार्गाने थैमान घालणाऱ्या वाळू माफियांविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे.
Jalna News
Jalna News : महसूलकडून ६० लाखांच्या मुद्देमालासह दोन हायवा जप्तPudhari File Photo
Published on
Updated on

Revenue Department Seizes Two Hyva Trucks and Contraband Worth ₹60 Lakhs

जालना, पुढारी वृत्तसेवा अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून छुप्या मार्गाने थैमान घालणाऱ्या वाळू माफियांविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोन हायवा गाड्या भोकरवाडी टोलनाक्याजवळ रंगेहात पकडण्यात आल्या. या कारवाईत तब्बल ६० लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन चालकांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna News
Nanded crime : नांदेड परिक्षेत्रात 9 दिवसांत 66 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार विजय चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी गणेश जगन खरात आणि राजेश्वर वैद्य यांच्या पथकाने भोकरवाडी टोलनाक्याजवळ सापळा संभाजीनगरच्या दिशेने वाळू घेऊन जाणाऱ्या २ संशयीत हायवा गाड्यांना पथकाने थांबवून तपासणी केली असता, त्यात प्रत्येकी २ ब्रास अवैध वाळू आढळून आली.

Jalna News
Udgir Ganja Seized | उदगीरमध्ये मोठी कारवाई: ७.४२ लाखांचा गांजा जप्त, १९ वर्षीय तरुण अटकेत

विकास केरुबा रचला. छत्रपती साळवे (३५, रा. आपतगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हायवा चालक, व कृष्णा शिवाजी आदमाने (रा. घाणेवाडी, ता. जि. जालना) हायवा चालक यांचे ३० लाख रुपये किमतीचा हायवा क्रमांक एमएच ५७, बी ९०२० आणि ३० लाख रुपये किमतीचा दुसरा हायवा क्रमांक एमएच २०, जीझेड ५३२२ यासह हायवा गाड्यांमध्ये असलेली २१ हजार ८०० रुपये किमतीची एकूण ४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी गणेश जगन खरात यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news