Jalna Accident News : भरधाव कारच्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

मृत्यूशी झुंज अखेर अपयशी
Jalna Accident News
Jalna Accident Newspudhari photo
Published on
Updated on

बदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथे भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षक विठ्ठल बाबुराव गालट (वय 70)( रा. उज्जैनपुरी) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात शुक्रवार (29) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक (एमएच 21 बीक्यू 7111) ही भरधाव वेगाने येत असताना विठ्ठल गालट यांना कारने जोराची धडक दिली. सदर कार केतन खोमणे यांच्या मालकीची असल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर विठ्ठल गालट हे कारच्या बोनेटमध्ये अडकून काही अंतरापर्यंत फरफटत गेले.

Jalna Accident News
Sindhudurg News : वैभववाडीतील काॅपी प्रकरणावरून गाजली शिक्षण समिती सभा

या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा उजवा कान पूर्णपणे तुटून निघाला होता. कान व नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. डाव्या हाताच्या मनगटाजवळील नसा तुटल्या होत्या. मेंदूला गंभीर मार लागून रक्तस्त्राव व सूज निर्माण झाली होती.

याशिवाय कंबरेतील मणक्यांना फ्रॅक्चर झाले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना शनिवार(30) रोजी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

Jalna Accident News
Kolhapur Circuit Bench | आरटीई अंमलबजावणी; दोन एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा

विठ्ठल बाबुराव गालट हे शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांनी बदनापूर तालुक्यातील कंडारी, लक्ष्मणनगर तांडा, भराडखेडा, नजीक पांगरी, केळीगव्हाण येथे काम केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news