Jalna News : तीन तालुक्यांत आठवडाभरासाठी कृषी वीजपुरवठ्यावर निर्बंध !

अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्याचा समावेश, जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी
Jalna News
Jalna News : तीन तालुक्यांत आठवडाभरासाठी कृषी वीजपुरवठ्यावर निर्बंध !file photo
Published on: 
Updated on: 

Restrictions on agricultural power supply in three talukas for a week!

जालना, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणातून पहिल्या सिंचन आवर्तनांतर्गत सोडलेले पाणी डाव्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचावे, यासाठी कालव्याच्या लाभक्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्याच्या उद्देशाने कृषी वीजपुरवठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यातील जायकवाडी मुख्य डावा कालवा ३० ते ११८ किलोमीटर हद्दीतील लाभक्षेत्रात बुधवार, दि. २५ पासून तर १ डिसेंबर या कालावधीत कृषी वीजपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यानंतर आवर्तन पूर्ण होईपर्यंत दररोज २० तास वीजबंदी लागू करण्यात येणार असल्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.

Jalna News
Jalna News : ५०० कोटींच्या आरोपप्रकरणी जरांगेंच्या घरी एसआयटीची दोन तास चौकशी

जायकवाडी धरणातून जलसंपदा विभागामार्फत आवर्तनाचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचविणे आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे समन्यायी वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार निवासी व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हदगल यांनी हे आदेश जारी केले आहेत, या कालावधीत संबंधित लाभक्षेत्रातील कृषी वीजपुरवठा १०० टक्के खंडित करण्यात येणार आहे.

या कालावधीनंतर चालू सिंचन पाणीपाळी पूर्ण होईपर्यंत दररोज २० तास भारनियमन लागू राहील. दररोज सकाळी ६ ते १० या चार तासांच्या कालावधीत कृषी वीजपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. या निर्बंधांमुळे कालव्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यास मदत होणार असून, पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.

Jalna News
Nilgai dies car collision Jalna-Ambad highway|जालना-अबंड राज्य महामार्गावर नीलगाय अन् चारचाकी गाडीची टक्कर, नीलगायीचा मृत्यू

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कारवाई

तीन तालुक्यांतील ६९ गावांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ५८ अन्वये कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्यात येणार असून, कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील लाभार्थ्यांपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून समन्वयाने कारवाई करण्यात येणार आहे. - शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी

या गावात राहणार अनधिकृत पाणी उपशाला बंदी

अंबड तालुकाः भांबरी, दह्याळा, चंदनापुरी खुर्द, चंदनापुरी बुद्रुक, रेणापुरी, चुर्मापुरी, पिं. सिरसगाव, शहापूर, दाढेगाव, धाकलगाव, सौंदलगाव, रामगव्हाण, नालेवाडी, डोणगाव, दोदडगाव, अंतरवाली सराटी, टाका, वडीगोद्री, करंजळा, वडिकाळ्या, घुंगडे हादगाव, भणंग जळगाव, भार्डी, रुई, सुखापुरी, बेलगाव व एकलेहरा या गावांचा समावेश आहे.

घनसावंगी तालुकाः खा. हिवरा, बाचेगाव, भायगव्हाण, दहिगव्हाण, तीर्थपुरी, खालापुरी, मांदळा, बोडखा, खडका, खडकावाडी, लिंबोनी, सिंदखेड, पिंपरखेड, आरगडे गव्हाण, पाडोळी, कुं, पिंपळगाव, मूर्ती, लिंबी, भेंडाळा, घानेगाव, कोटाळा, विरेगव्हाण व जांबसमर्थ या गावांचा समावेश आहे.

परतूर तालुकाः वाहेगाव, आंतरवाला, सातारा, आसनगाव, हादगाव, बाणाची वाडी, ढोणवाडी, वडारवाडी, पळशी, धामणगाव, ठोकमाळ, कनकवाडी, लोणी, आष्टी, रायगव्हाण, आनंदगाव, ब्राह्मणवाडी आणि फुलवाडी. या गावात आदेश लागू राहणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.