Nilgai dies car collision Jalna-Ambad highway|जालना-अबंड राज्य महामार्गावर नीलगाय अन् चारचाकी गाडीची टक्कर, नीलगायीचा मृत्यू

जालना-अबंड राज्य महामार्गावर नीलगाय अन् चारचाकी गाडीची टक्कर, जंगली नीलगायीचा मृत्यू
Nilgai dies car collision Jalna-Ambad highway
अपघातग्रस्त चारचाकी वाहन (छाया : अकबर शेख)
Published on: 
Updated on: 

शहागड : शहागडकडून अंबडकडे जात असलेली चारचाकी वाहन क्र. एम.एच.21 बी.व्ही.5177 आणि भरधाव वेगात उड्या मारत जात असलेली नील गायीची टक्कर झाली. चारचाकी वाहनाला गायीने जोराची धडक दिल्याने नीलगायीचा जागीच मृत्यू झाला. तर चार चाकी गाडीचा समोरच्या भागाचे नुकसान झाले.

अबंड तालुक्यातील जालना- अंबड राज्य महामार्गावरील झिरपी फाट्याजवळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गाडीत फक्त चालकच होता. सुदैवाने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. वन विभाग आणि अंबड पोलीस ठाण्याचे बीट जमादार वाघमारे यांना माहिती देण्यात आलेली होती. तत्काळ धाव घेत बीट जमादार विलास वाघमारे यांनी गाडीचा पंचनामा केला आहे.

Nilgai dies car collision Jalna-Ambad highway
Jalna Godavari river water released| गावांतील शेतकऱ्यांच्या पाणी सोडण्याच्या मागणीला अखेर यश; गोदावरी नदीपात्रात पाणी दाखल

वनविभाग पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवून नील गायीचा पंचनामा करणार असल्याची माहिती आहे.

Nilgai dies car collision Jalna-Ambad highway
Jalna News : ५०० कोटींच्या आरोपप्रकरणी जरांगेंच्या घरी एसआयटीची दोन तास चौकशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.