

Raosaheb Danve: Prime Minister Narendra Modi's leadership is steering the country towards becoming a global superpower
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाला जागतिक महासत्तेकडे नेणारे असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या ४३९९ दिवसांहून अधिक काळातील अद्वितीय नेतृत्व, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून भोकरदनला मंगल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायती राज समितीचे अध्यक्ष आ. संतोष दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकरदन येथील पवित्र खंडोबा महाराज मंदिरात भव्य महाआरती आणि महाअभिषेक संपन्न झाला. यावेळी दानवे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीचा ४३९९ दिवसांचा हा कार्यकाळ केवळ एका पदाचा कार्यकाळ नसून, तो भारताला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यवान बनवणारा ऐतिहासिक राष्ट्रसेवा प्रवास आहे. गरिबांचे कल्याण, पायाभूत सुविधांचा विकास आणि जागतिक स्तरावर भारताची वाढलेली पत ही मोदीजींच्या दूरदृष्टीची फलश्रुती आहे.
भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनण्याचा मान त्यांना मिळाला, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे."
"आज आम्ही कुलदैवत खंडोब महाराजांच्या चरणी साकडे घातले आ की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुन असलेल्या या ऐतिहासिक विका प्रवासाला अशीच निरंतर गती मिळ आणि देशातील प्रत्येक नागरिका जीवन सुख-समृद्धीने बहरून जाव कार्यकर्त्यांनी हा विकासाचा संदे घराघरांत पोहोचवावा." यावेळ पदाधिकारी उपस्थित होते.
या ठिकाणी आरती
भोकरदन मंडळासह पिंपळगाव रेणुकाई मंडळ, सोयगाव देवी मंडळ आणि राजूर मंडळामध्ये देखील या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधन स्थानिक पवित्र स्थळावर मोठ्या प्रमाणात अभिषेक व महाआरती करून हा सोहळा साजरा करण्यात आला.