Rajureshwar temple donation : राजुरेश्वराच्या चरणी 21.94 लाखांची देणगी अर्पण !

अंगारकी चतुर्थीला भक्तांचा उदंड प्रतिसाद; भक्तिभावाने परिसर दुमदुमला
Rajureshwar temple donation
राजुरेश्वराच्या चरणी 21.94 लाखांची देणगी अर्पण !pudhari photo
Published on
Updated on

जालना ः अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्री गणपती संस्थान राजूर येथे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तीभावाने दर्शन घेतले. या दिवशी विविध स्वरूपातील देणग्यांमधून तब्बल 21 लाख 94 हजार 596 रुपये इतकी रक्कम जमा झाल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संस्थान देणगी, अभिषेक, बांधकाम तसेच सुबक मार्बल आसनासाठी भाविकांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. यामधून एकूण 8 लाख 50 हजार 526 रुपये जमा झाले. तसेच दानपेटी व बांधकाम दानपेटीतून एकूण 13 लाख 44 हजार 70 रुपये प्राप्त झाले. या दोन्ही रकमा मिळून एकूण देणगीचा आकडा 21 लाख 94 हजार 596 रुपये इतका झाला आहे.

Rajureshwar temple donation
Monkey Catching Reward Doubled | राज्यातील बागायतदारांना मोठा दिलासा; माकड पकडणाऱ्यांचे मानधन दुप्पट!

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी उत्साहात गणरायाचे दर्शन घेत नवस फेडले. अंगारिका चतुर्थी निमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी उसळली होती. संस्थान प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. संस्थानतर्फे भाविकांसाठी सुरळीत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Rajureshwar temple donation
Weekly Horoscope: महादेवाच्या कृपेने या आठवड्यात होणार धनलाभ! पाहा तुमचे साप्ताहिक राशिभविष्य

देणगीचा तपशील

संस्थान देणगी : 7,34,800

अभिषेक देणगी : 53,429

बांधकाम देणगी : 13,700

मार्बल आसन देणगी : 48,597

उपएकूण : 8,50,526

दानपेटी : 9,06,770

बांधकाम दानपेटी : 4,37,300

उपएकूण : 13,44,070

एकूण देणगी : 21,94,596

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news