Jalna road accident : आयशरची दुचाकीला धडक; युवक ठार

युवक गंभीर जखमी, पोलिसांची धाव
Jalna road accident
जालना ः जालना ते राजूर मार्गावरील मानदेऊळगाव येथे झालेल्या अपघातात दुचाकी चेंदामेंदा झाली. pudhari photo
Published on
Updated on

जालना ः राजूर ते जालना रोडवरील मानदेऊळगाव शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर वाहन चालकाने वेगावर नियंत्रण गमावल्याने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की मोटारसायकलवरील मनोज ज्ञानेश्वर बेडके (वय 25, रा. चांदाई एक्को) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विकास विष्णू ढाकणे (वय 28, रा. चांदाई एक्को) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Jalna road accident
‌POKRA scheme scam : ‘पोकरा‌’ योजनेत तब्बल 65 कोटींच्या घोटाळ्याचा नवा अध्याय

अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार जितेंद्र तागवले व मदन बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीस उपचारासाठी हलवले तसेच मृतदेह पुढील तपासणीसाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Jalna road accident
World FAZA Championship 2026 : नांदेडच्या लेकीची दुबईत सुवर्णझेप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news