World FAZA Championship 2026 : नांदेडच्या लेकीची दुबईत सुवर्णझेप

जागतिक फाजा चॅम्पियनशिपमध्ये भाग्यश्री जाधवला दोन सुवर्ण पदके
World FAZA Championship 2026
भाग्यश्री जाधवpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेडच्या मातीतील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू आणि पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकावला आहे. दुबई येथे पार पडलेल्या जागतिक फाजा चॅम्पियनशिप-2026 स्पर्धेत भाग्यश्रीने गोळाफेक आणि भालाफेक अशा दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.

मुळच्या मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री यांनी 2021 च्या टोकियो आणि 2024 च्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा ध्वजधारक होण्याचा सर्वोच्च बहुमान त्यांना मिळाला होता. राज्य सरकारने त्यांच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्रदान केला असून, त्यांची क्लास-वन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

World FAZA Championship 2026
ST bus smart card rule : एसटी सवलतधारकांनो सावधान! आता स्मार्ट कार्डशिवाय प्रवास नाही

यशाचे श्रेय गुरुजनांना

“माझे मुख्य प्रशिक्षक सी. सत्यनारायण, सह-प्रशिक्षिका पुष्पा मॅडम आणि मार्गदर्शकांच्या प्रेरणेमुळेच मी हे यश संपादन करू शकले,“ अशी भावना भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केली. त्यांच्या या जागतिक यशाबद्दल जिल्ह्यातून आणि क्रीडा विश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

World FAZA Championship 2026
Beed Crime : सोशल मीडियावरील स्टोरीचा वाद जीवावर बेतला; रुईनालकोलमध्ये तरुणाचा खून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news