Jalna Rain Damage : वेचणीसाठी आलेल्या कापसाचे पावसाने नुकसान

वालसावंगी परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका, शेतकरी बनला हतबल
Jalna Rain Damage
Jalna Rain Damage : वेचणीसाठी आलेल्या कापसाचे पावसाने नुकसानFile Photo
Published on
Updated on

Rain damages cotton that was ready for harvesting

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यासह वालसावंगी परिसरात दोन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी पिकात पाणी साचल्याने वेचणीसाठी आलेल्या कपाशी पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Jalna Rain Damage
Jalna Rain Damage : खरीप हंगामातील पिकांची लागली वाट

अवकाळी पावसामुळे शेत जमिनीचे खरडून वाहून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणातील नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील कपाशी, मिरची मका, सोयाबीन पिकात पाणी असल्याने पावसामुळे पिवळे पडत पिके मोठे प्रमाणात खराब झाली आहे.

त्यात शेतकरी ओल्या दुष्काळात डबघाईला आला असून त्यातच खरीप हंगामातील पिकावर पाणी फिरल्याचे दिसून येत आहे. मात्र महसूल विभागाने याकडे लक्ष घालून तातडीने पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.

Jalna Rain Damage
Jalna News : गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना पकडले
दोन वर्षापासून पिकाला कुठल्याही प्रकारे योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या घरात अद्यापही सोयाबीन पडून आहेत. त्यातच मालाचे भाव घसरत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवाडेना झाली आहे. त्यातच मात्र पिक विमा कंपनीने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात थट्टा केली. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून तातडीने तातडीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करावी.
सुखलाल आगे, शेतकरी वालसावंगी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news