Radio News : रेडिओ डिजिटल युगात दुर्मीळ

पूर्वी मनोरंजनासाठी वापर, रेडिओची फारशी माहिती नाही
Radio
RadioPudhari
Published on
Updated on

Radio is a rarity in the digital age

अविनाश घोगरे

घनसावंगी : एकेकाळी मनोरंजन, माहिती आणि जनजागृतीचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखला जाणारा रेडिओ आजच्या डिजिटल युगात दुर्मीळ होत चालला आहे. मोबाईल, इंटरनेट, स्मार्ट टीव्ही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे रेडिओचा वापर दिवसेंदिवस कमी होत असून, नवीन पिढीला रेडिओबाबत फारशी माहितीही राहिलेली नाही.

Radio
उदंड झाला सूर्यप्रकोप

पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात रेडिओ असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. सकाळी आकाशवाणीच्या बातम्या, धार्मिक कार्यक्रम, विविध भारतीवरील गाणी, शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन तसेच क्रिकेटच्या थेट समालोचनामुळे रेडिओला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. गावातील चौक, हॉटेल, चहाच्या टपऱ्या आणि शेतामध्येही रेडिओचा आवाज कायम ऐकू येत असे.

अनेक कुटुंबे संध्याकाळी एकत्र बसून रेडिओवरील कार्यक्रमांचा आनंद घेत असत. विशेषतः ग्रामीण भागात रेडिओ हे माहितीचे सर्वात विश्वासार्ह माध्यम होते. हवामानाचा अंदाज, शेतीविषयक सल्ला, शासनाच्या योजना आणि देश-विदेशातील घडामोडी यांची माहिती रेडिओद्वारे सहज उपलब्ध होत असे.

Radio
AI Camera Technology | एआय कॅमेरा आपोआप टिपेल प्रत्येक क्षण!

वीज नसलेल्या भागात बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओमुळे लोकांचा जगाशी संपर्क कायम राहत होता. मात्र गेल्या दोन दशकांत तंत्रज्ञानात झालेल्या झपाट्याने बदलांमुळे रेडिओची लोकप्रियता कमी झाली. स्मार्टफोनच्या माध्यमातून गाणी, चित्रपट, बातम्या, व्हिडिओ आणि थेट प्रक्षेपण सहज उपलब्ध होऊ लागल्याने लोकांनी रेडिओपासून हळूहळू अंतर ठेवले.

इंटरनेटमुळे मनोरंजनाची असंख्य साधने उपलब्ध झाल्याने रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या घटली आहे. आज अनेक घरांमध्ये जुने रेडिओ धूळखात पडलेले दिसतात. काही ठिकाणी ते केवळ जुन्या आठवणींची निशाणी म्हणून जपून ठेवले जात आहेत. रेडिओ दुरुस्तीची दुकानेही आता क्वचितच पहायला मिळतात. नवीन पिढीतील अनेक मुलांनी प्रत्यक्ष रेडिओ वापर-लेलाच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

असे असले तरी रेडिओचे महत्त्व पूर्णपणे संपलेले नाही. आपत्तीच्या काळात, दुर्गम भागात आणि माहितीच्या प्रसारणासाठी आजही रेडिओ प्रभावी माध्यम मानले जाते. एफएम रेडिओच्या माध्यमातून अनेक श्रोते आजही गाणी, बातम्या आणि विविध कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत.

रेडिओचा आधार

रेडिओ हे आमच्या पिढीचे सर्वात जवळचे मनोरंजन आणि माहितीचे साधन होते. त्या काळात मोबाईल, टीव्ही किंवा इंटरनेटची सुविधा नव्हती. त्यामुळे बातम्या, गाणी, कृषी मार्गदर्शन आणि क्रिकेटचे समालोचन ऐकण्यासाठी रेडिओचाच आधार होता. आज तंत्रज्ञानामुळे अनेक आधुनिक साधने उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे रेडिओचा वापर कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news