पृथ्वीराज चव्हाण - मनोज जरांगे यांची बंद दराआड चर्चा

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange | राजकीय चर्चा झाल्याचा दोघांकडून इन्कार
Prithviraj Chavan Meet Manoj Jarange
अंतरवाली सराटी येथे पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. Pudhari News Network
Published on
Updated on

वडीगोद्री: पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा कायदा केला. त्यामुळे आरक्षण टिकले नाही, असा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अंतरवाली सराटी येथे आज (दि.२२) चव्हाण आणि रजनीताई पाटील यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी बंद दरवाजाआड दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या भेटी दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा मनोज जरांगे यांच्यासोबत झाली नाही. त्यांच्या तब्बेतीची विचाररपूस करण्यासाठी येथे आलो होतो, असे चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यामुळे आरक्षण टिकले नाही, असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. तर आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी तब्येतीची विचारपूस केली आणि आरक्षणाबाबत चर्चा झाली, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange
भाजपमधील अनेक जण मला गुपचूप येऊन भेटतात : मनोज जरांगे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news