Jalna News : टँकर, चारा छावण्या, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या

आमदार हिकमत उढाण : मायक्रो फायनान्सच्या वसुलीबाबत कडक भूमिका
Jalna News
Jalna News : टँकर, चारा छावण्या, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्याfile photo
Published on: 
Updated on: 

Prioritize water tankers, fodder camps, and water conservation works

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळ निवारणार्थ त्वरित अंमलबजावणी करा असे निर्देश आमदार हिकमत उढाण यांनी प्रशासनाला दिले. घनसावंगी येथील आमदार जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत दुष्काळ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पाणीटंचाई, जनावरांचा चारा, अन्नधान्य वाटप, जलसंधारण, शासकीय योजनांची अंमलबजावणी, पीककर्ज आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी वसुली अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Jalna News
MLA Hikmat Udhan : दुष्काळी कामात हलगर्जीपणा नको

ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे, त्या सर्व गावांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. गावनिहाय पाणीपुरवठ्यासह सर्कलमध्ये चारा छावणी सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेततळे, सिंचन विहिरी, शेताच्या बांधावर वृक्षलागवड यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा. प्रत्येक गावात शेतकरी मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावनिहाय विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आमदार उढाण यांनी केल्या.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार रमेश पागोटे, तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांच्यासह महसूल, पंचायत समिती, महावितरण व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jalna News
Skill training : जिल्ह्यातील १३८० युवकांना कौशल्य प्रशिक्षण; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

मायक्रो फायनान्स कंपन्यांचा त्रास खपवून घेतला जाणार नाही !

दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जबरदस्तीने वसुली करणे, मानसिक दबाव आणणे अथवा विनाकारण त्रास देणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन कंपन्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर माझे आणि प्रशासनाचे विशेष लक्ष राहील, असा स्पष्ट इशारा आमदार हिकमत उढाण यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.