Jalna News : दुर्गादेवी विसर्जनासाठी कुंडावर जय्यत तयारी; महापालिका सज्ज

४५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सुरक्षेवर भर
Jalna News
Jalna News : दुर्गादेवी विसर्जनासाठी कुंडावर जय्यत तयारी; महापालिका सज्जfile photo
Published on: 
Updated on: 

Preparations are underway at the tank for the immersion of Goddess Durga; Municipal Corporation fully geared up

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील दुर्गादेवी विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि उत्साहात पार पडावा, यासाठी जालना महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मोती बाग परिसरातील विसर्जन कुंडावर विसर्जनासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांची तयारी करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार विसर्जन प्रक्रियेचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

Jalna News
Jayakwadi Water : जायकवाडीच्या पाण्यावरून शेतकरी अन् सरकारमध्ये संघर्ष पेटणार

दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार, दि. २० आणि उद्या बुधवार, दि. २१ रोजी अशा दोन दिवसांत देवीचे विधिवत पूजन, होमहवन आणि त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार विसर्जन सोहळा पार पडणार आहे.

या काळात विसर्जनस्थळी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने विविध विभागांच्या माध्यमातून आवश्यक व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच संपूर्ण सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी मदत आणि विविध विभागांमधील समन्वयावर भर देण्यात आला आहे. विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासोबतच संभाव्य आपत्कालीन एरिस्थितीचा करण्यासाठीही प्रशासनाने तयारी केली आहे. विसर्जन प्रक्रियेदरम्यान जलसुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

Jalna News
Jalna Crime | भोकरदन तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगार चार जिल्ह्यांतून वर्षभरासाठी हद्दपार

स्वच्छता आणि आपत्कालीन मदतीवर भर

मोती बाग परिसरातील विसर्जन कुंडावर स्वच्छता राखणे, पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करणे आणि विसर्जन प्रक्रियेत सहभागी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवणे, यासाठी मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पोलिस दलासह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी या व्यवस्थेत सहभागी असणार आहेत.

दुर्गादेवी विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. भाविकांनी विसर्जनस्थळी प्रशासनाने दिलेल्या सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करावे, शिस्त राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. विसर्जन सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुमारे ४०० ते ४५० अधिकारी-कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहे.
विजय फुलंब्रीकर, सहायक आयुक्त, महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news