Gutkha Seized : सोमठाणा रस्त्यावर पोलिसांनी पकडला २५ लाखांचा गुटखा

चंदनझिरा पोलिसांची कारवाई; दोन संशयितांना घेतले ताब्यात
Gutkha Seized
Gutkha Seized : सोमठाणा रस्त्यावर पोलिसांनी पकडला २५ लाखांचा गुटखाfile photo
Published on
Updated on

Police Seize Gutkha Worth ₹25 Lakhs on Somthana Road

बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर शहराच्या हद्दीत सोमठाणा रस्त्यावर चंदनझिरा पोलिसांनी बुधवार, दि. २० रोजी अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्याविर-ोधात कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Gutkha Seized
Jalna crime | रांजणीत पोलिसांची मोठी कारवाई; पावणेदोन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

दरम्यान, चंदनझिरा पोलिसांना या गुटख्यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चंदनझिरा पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान सुमारे २५ लाखांचा गुटखा आणि ८ लाखांचे वाहन असा तब्बल ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, गुटखा राज्यात प्रतिबंधित असतानादेखील गुटख्याची सर्रासपणे वाहतूक व विक्री करण्यात येत असल्याचे येत आहे. या पूर्वी देखील बदनापूर तालुक्यातील काजळा येथे साठवून ठेवला गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Gutkha Seized
Parbhani Crime: खंजीर घेऊन फिरणारा युवक गजाआड

यामुळे गुटखामाफियांचे पालेमुळे खोलवर पोहचले असल्याचे दिसून येते. बदनापूर शहरासह गुटखामाफियांनी डोके वर काढले जिल्हाभरात आहे. या नशेखोरीसाठी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट गुटखामाफियांनी घातला आहे. त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करून अंकुश लावण्याचे काम करण्यात येत आहे.

ही कारवाई बुधवारी दि. २० रोजी संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news