Police route march : गणेश उत्सव, गौरीपूजन सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

गणेशोत्सव, गौरीपूजन सण शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन
Police route march
Police route march : गणेश उत्सव, गौरीपूजन सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलनfile photo
Published on
Updated on

Police route march ahead of the Ganesh Utsav and Gauri Pujan festivals

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः गणेश उत्सव गौरीपूजन या पार्श्वभूमीवर शहरातील गणपती मिरवणूक मार्गावरून भोकरदन पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर व ठाणे प्रमुख संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन केले. शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी पावने पाच ते सव्वा पाच या कालावधीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांचे उपस्थितीत भोकरदन शहरांमध्ये मुख्य मिरवणूक मार्गाने हे पथसंचलन करण्यात आले.

Police route march
Drought News : दुष्काळाच्या वणव्यावर पावसाचा शिडकावा

या दरम्यान नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. हा उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत तसेच डीजे मुक्त मिरवणुका काढण्यात याव्या याबाबत योग्य त्या सूचना करण्यात आल्या.

Police route march
Bribe Case : लाचखोरी भारी पडली ! राज्यात दोन वर्षांत ५१ लोकसेवक दोषी

या पथसंचलनाला उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांचे कर्मचारी, पोलिस ठाणे भोकरदनचे ३ अधिकारी १८ अंमलदार, एस आर पी एफ १ प्लटून, २८ होमगार्ड हजर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news