

Police personnel were honored by Superintendent of Police Ajaykumar Bansal for their outstanding performance
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील सोमठाणा येथे घडलेल्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या बदनापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पोनि. मच्छिंद्र सुरवसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड, पोलिस उपनिरीक्षक संतोष कुलाकरे, पोलिस अंमलदार अब्दुल बारी अब्दुल अजिज शेख, बारवाल, शेख इस्माईल, महिला पोलिस प्रीती जाधव, सानप आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावली