

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहे. त्यातच उन्हाची तीव्रता 41 डिग्री सेल्सियस असल्याने तापमान दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे नागरिकांना उन्हाचा मोठा झटका सहन करावा लागत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शासकीय दवाखान्यासह खासगी दवाखान्यात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
पिंपळगाव रेणुकाई ही मुख्य बाजारपेठ आल्याने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्या कारणाने पिंपळगाव रेणुकाई येथील हॉस्पिटल मध्ये रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे यामुळे तापमानाने नागरिकांना हैराण झाले आहेत.
सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांनी लागलेली नसली तरीही पाणी प्यावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री किंवा टोपी रुमाल चा वापर करावा शक्य असल्यास दुपारी बारा ते तीन दरम्यान जरा बाहेर जाणे टाळावे. उष्णतेच्या लाट जास्त असल्याने आपल्या जीवितस लोकांनी धोका निर्माण होऊ शकतो.
डॉक्टरांचा सल्ला
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास घरी बनवण्यात आलेले लस्सी, लिंबू, ताक पाणी इत्यादीचा वापर नियमित करावा अशक्तपणा डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. कल्याणी बावस्कर यांनी केले आहे.