Jalna Political News : सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अंबादास दानवे

विधानसभा निवडणुकीदरम्यान आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप केले आहे अशी अंबादास दानवे यांनी टीका केली.
Jalna Political News
Jalna Political News : सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अंबादास दानवे File Photo
Published on
Updated on

Opposition leader Ambadas Danve criticizes the state government

मंठा, पुढारी वृत्तसेवा :

विधानसभा निवडणुकीदरम्यान आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप केले आहे. त्यांना राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वैद्य वडगाव येथे क्या हुआ तेरा वादा अभियानांतर्गत सुरू असलेल्या बैठकी दरम्यान बोलताना केली.

Jalna Political News
Jalna Farmers Protest | विविध मागण्यांबाबत गोदावरी नदीत शेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन

या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख महादेव कदम, महेश नळगे, प्रदीप बोराडे, अशोक अधाव, माऊली सरकटे, अनंता वैद्य, आसाराम बोराडे यांची उपस्थित होती.

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा महायुती सरकारला विसर पडला असल्याने त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उबाठाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा, असा प्रश्न सरकारला विचारण्यात येत आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक योजना जाहीर केल्या, भरभरून आश्वासने दिली.

Jalna Political News
Krishik app : पिकाला किती खत द्यायचे ? कृषिक ॲपवर कळणार, शेतीची योग्य माहिती मिळणार

यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लाडक्या बहीणचे पंधराशे रुपयांवरून २ हजार शंभर रुपये करण्याचे दिलेले आश्वासन तसेच जीएसटीचा परतावा, नियमित कर्ज फेड करणाऱ्या खातेदारांना प्रोत्साहनपर अनुदान, वृद्ध नागरिकांना पेन्शन २५ लाख नोकऱ्या आणि १० हजार विद्यार्थ्यांना विद्या वेतन देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दानवे यांनी या वेळी अंबादास दानवे बोलताना दिला.

कार्यक्रम यशस्वितेसाठी बाळासाहेब वैद्य, सचिन चव्हाळ, रवी काळे, दासु खरात, पांडुरंग वैद्य, इम्रान पठाण, निलेश बोराडे, सतीश खवने, गोरख चव्हाण, ऋतिक जाधव, गजानन झोल, प्रवीण पंडित, तानाजी मोरे, डिगांबर बोराडे, ओम केधंळे, पवन वाघमारे, राम वैद्य, समाधान वैद्य, कैलासराव वैद्य, गणेशराव वैद्य, गणेशराव नळगे, प्रविण वैद्य, नीलेश वैद्य, माऊली वैद्य, जिवन वैद्य, सुनील वैद्य, किसन वैद्य, नवनाथ वैद्य, अविनाश मगर, बाळासाहेब देशमाने यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news