Jalna News : महायुती सरकारने जनतेला फसविले

कुंभार पिंपळगाव येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप
Jalna News
Jalna News : महायुती सरकारने जनतेला फसविलेFile Photo
Published on
Updated on

Opposition leader Ambadas Danve accuses Mahayuti

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने सत्ता मिळविण्यासाठी आश्वासनाचे आमिष देऊन जनतेला फसविले आहे. विधानसभा निवडणुकीत भरभरून आश्वासन देण्यात आले? मात्र सरकार स्थापन झाले, तर दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला पडला आहे. आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही, म्हणून शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या क्या हुआ तेरा वादा? या आंदोलन अंतर्गत घनसावंगी विधानसभा मतदार संघातील कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत असताना बोलत होते.

Jalna News
Jalna News : डाटा एन्ट्री ऑपरेटर गेले बेमुदत संपावर

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकारने जी आश्वासनं दिली होती. त्यांची अंमलबजाणी सुरू झालेली नाही, त्यामुळे क्या हुआ तेरा वादा असे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

शेतकरी कर्ज मुक्ती, सोयाबीनला हमीभाव, पीकविमा का बंद केला. लाडक्या बहिणींना २१०० मदत देणार होते, त्याचे काय झालं? केवळ शेतकऱ्यांचे आणि भोळ्या बहिणींचे मत मिळविण्यासाठी महायुती सरकारने थापा मारल्या, अन्नदाता बनेल ऊर्जादाताची घोषणा केली, पण प्रत्यक्षात आजही शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहे. कारण उर्जादाता बनण्याऐ वजी अन्नदाता आजही अंधारातच असल्याने ही योजना केवळ कागदावरच आहे. म्हणूनच आता या सर्व आश्वासनाबावत सरकारला जाब विचारला जाणार आहे. यावेळी उपस्थितीत मान्यवरानी मार्गदर्शन केले आहे.

Jalna News
Jalna News : जिल्ह्यात ११.२३ टक्के दूषित पाणी

यावेळी तहसीलदार योगिता खटावकर, तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ, उपजिल्हा प्रमुख हनुमान धांडे, तालुकाध्यक्ष संदीप कंटुले, गटनेते यादवराव देशमुख, बबनराव घोगरे, मधुकर साळवे. प्रल्हादराव नाईकनवरे, रामराव सोळंके, राजू तांगडे, महादेव काळें, रमेशराव तौर, दिलीप कंटुले, रमेश कंटुले, अंकुश कंटुले, हासनुभाई शेख, गणेश काळे, शिवजी सोळंके, प्रविण वळसे, रमा बोट, बाळू देवकर, कुरेशी शफिक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news