

One House One Shidori initiative: bhakari, chapati, thecha, chutney send to Mumbai for protesters
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील आझाद मैदानात बसलेल्या मनोज जरागे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक व पिंपरखेड, भादली या सह आदी गावातील मराठा समाज बांधवांची एक घर एक शिदोरी आपल्या मराठा समाज बांधवासाठी घरोघरी माधुकरी मागून मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
यासाठी १० हजार बांधवांना पुरेल इतके जेवण सोबत गुंज बुद्रुक येथून, पिंपरखेड बुद्रुक येथून १ पिकअपमध्ये ज्वारीच्या भाकरी, आणि पोळ्या, तसेच ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे, २०० किलो तांदूळ व २०० बॉक्स पाणी बॉटल आणि स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गॅस, भट्टा व इतर साहित्य पाठविण्यात आले.
मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या २९ ऑगष्टपासूनच्या उपोषणात पावसामुळे जेवणाची व्यवस्था होऊ शकली नाही. तसेच सरकारने देखील सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने आंदोलन कर्त्यांना उपाशी पोटी झोपावे लागले होते. तसेच आझाद मैदानावर पावसाने चिखल पसरला आहे, ज्यामुळे आंदोलकांना अस्वच्छता आणि हाल सहन करावे लागत आहेत. काही आंदोलनाकडे स्वयंपाकाचे साहित्य आहे, पण पावसामुळे त्यांना स्वयंपाक करता येत नाही. आणि परिणामी उपासमारीचे संकट मराठा आंदोलनाकावर आले आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक, व पिंपरखेड बुद्रुक, गावामधून मोठ्या संख्येने लोक माधुकरी गोळा करून मुंबईला पाठवत आहेत.
आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी गुंज बुद्रुक व पिंपरखेड बुद्रुक आदी गावातील घराघरातून मधुकरी गोळा करून १० हजार बांधवांना पुरेल इतके जेवण सोबत गुंज बुद्रुक येथून २ बोलेरो पिकअप. पिंपरखेड बुद्रुक येथून १ पिकअपमध्ये ज्वारीच्या भाकरी, आणि पोळ्या, तसेच ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे, २०० किलो तांदूळ पाठविले.