Jalna News : पर्जन्यमापक यंत्राची तहसीलदारांकडून पाहणी

चुकीच्या नोंदीची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार अहवाल
Automatic weather station
पर्जन्यमापक यंत्राची तहसीलदारांकडून पाहणी pudhari photo
Published on
Updated on

भोकरदन : नव्या जागेत स्थलांतरित झालेले हसनाबाद येथील स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्यमापक यंत्रात पावसाची चुकीची नोंद होत आहे. या संदर्भात दैनिक पुढारीने तीन ऑगस्टच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे व हसनाबादचे मंडळ अधिकारी के.टी.सोनवणे यांनी स्वयंचलित हवामान केंद्राची पाहणी करून येथील पर्जन्यमापक यंत्राने घेतलेली पावसाची नोंद चुकीची असल्याचे मान्य केले आहे. तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थलांतरित झालेल्या केंद्रातील पर्जन्यमापक यंत्राने दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाची चुकीची नोंद घेत १५५ मिलिमीटर पाऊस झाल्याचे दाखविले प्रत्यक्षात अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडला होता. यामुळे शेतकऱ्यांचे पीकविम्याचे नुकसान होणार असल्याची बाब दैनिक पुढारी व संबंधित शेतकरी समाधान वानखेडे यांनी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सोमवार (दि.३) रोजी हसनाबाद येथील स्वयंचलित हवामान केंद्रास भेट देऊन पर्जन्यमापक यंत्राची पाहणी केली.

Automatic weather station
Chhatrapati Sambhajinagar crime : 'अॅमेझॉन'च्या साडेसात लाखांच्या वस्तूंवर कर्मचाऱ्याचा डल्ला

त्याप्रमाणे या ठिकाणी असलेल्या इतर त्रुटींचीही पाहणी करून त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता असून या केंद्राचे गेट उंच व कुलूप बंद असावे असे मान्य केले तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल.

तहसीलदारांकडून चार हवामान केंद्रांना भेटी

हसनाबाद येथील पर्जन्यमापक यंत्रात चुकीची नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी तालुक्यातील हसनाबाद सोबतच राजूर, केदारखेडा व भोकरदन येथील हवामान केंद्रांची पाहणी केली आहे. उर्वरित चार स्वयंचलित हवामान केंद्रांना भेट देऊन तालुक्यातील आठही हवामान केंद्रांचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Automatic weather station
Sambhajinagar Municipal Corporation : महापालिकेत खांदेपालट, केवळ खातेबदलाची मलमपट्टी ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news