

Now Mahavistar AI app for farmers
आन्वा, पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महाविस्तार एआय हे नवे मोबाईल अॅप लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना मातीपासून ते बाज ारपेठेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी हे अत्याधुनिक एआय-आधारित अॅप विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी टाकून नोंदणी केली असून त्या आधारे शेतीसंबंधी माहिती घेत आहे. महाविस्तार एआय अँप कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हे अँप त्यांच्या मोबाईल मध्ये फार्मर आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे नोंदणी करून देत आहे.
या अॅपमध्ये पिकसंरक्षण, हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, बियाणे निवड, रोग-किड नियंत्रण, बाजारभाव अशा विविध सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या समस्येनुसार तत्काळ सल्ला देऊ शकते.
कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाविस्तार एआय अँप मुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीही वाचणार असून उत्पादनक्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे. अँप मराठीसह इतर स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध करण्यात आले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ते वापरणे अधिक सोपे झाले आहे. शेतकरी बांधवांनी या अॅपचे स्वागत करत, त्यातून मिळणाऱ्या माहितीद्वारे शेतीत अधिक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. अँप डाऊनलोड करून त्याचा प्रत्यक्ष शेतीसाठी योग्य वापर कारण्यात असून भोकरदन तालुक्यात नोंदणी करून घेऊही अजून हा आकडा वाढतच आहे.
हवामानातील अनिश्चितता, बाजारभावातील सततचे चढ-उतार आणि शेतीसंबंधी तांत्रिक माहितीचा अभाव अशा तिहेरी समस्यांशी राज्यातील शेतकरी रोज झुंजत आहेत. पण आता कृषी विभागाने एक अत्यंत दिलासादायक आणि आधुनिक पाऊल उचलले आहे.
शेतकऱ्यांना मातीपासून ते बाज- ारपेठेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी महाविस्तार हे अत्याधुनिक एआय-आधारित अॅप विकसित करण्यात आले आहे.
संवाध साधू शकतात
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या समस्या किंवा शंका यांचे निरसन करायचे असल्यास, ते मजकूर किंवा आवाजाद्वारे थेट चॅटवॉटशी संवाद साधू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, हे अॅप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल मार्गदर्शक म्हणून केवळ काही सेकंदात अचूक सल्ला उपलब्ध करून देईल.