Mosambi Prices Fell : मोसंबी १७ हजार रुपये प्रतिटन

आवक वाढली, अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी त्रस्त
Mosambi Price
Mosambi Prices Fell : मोसंबी १७ हजार रुपये प्रतिटनPudhari
Published on
Updated on

Mozambi 17 thousand rupees per ton

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना मोंढ्यात पावसामुळे मोसंबीचा दर्जा घसरल्याने मोसंबीचे भाव पडले आहेत. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. सध्या मोसंबी १२ हजार ते १४ हजार रुपये टन या भावाने विक्री होत आहे.

Mosambi Price
Jalna News : शासकीय नोकरीचे स्वप्नं साकार; १२८ अनुकंपा उमेदवारांना शासन नियुक्तीचे आदेश

जालना शहरातील नवीन मोंढ्यात मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची दररोज आवक १५० ते २०० टन होत आहे. येथे मोसंबीचे दर प्रति टन १२ हजार ते १४ हजार रुपयां दरम्यान आहेत. पावसामुळे अनेक मोसंबी उत्पादकांना मोसंबी झाडावरुन तोडण्यास उशीर झाल्याने पिवळी मोसंबी बाजारात येत आहे. पिवळी मॉसबी जास्त दिवस टिकत नसल्याने या मोसंबीला बाहेरगावी पाठविण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक बाजारातील ज्युस सेंटरसह जवळपासच्या बाजारात मोसंबी पाठविली जात आहे.

यंदा मोसंबीचे भाव तेजीज राहण्याची शक्यता वर्तविली जात होती. दरवर्षी नवरात्रामधे मोसंबीचे भाव मागणी वाढल्याने तेजीत असतात. मात्र यंदा पावसामुळे मोसंबीचे गणित बिघडले आहे.

Mosambi Price
Jalna News : सोंगणीसाठी शेतकऱ्यांची कसरत, मजुरीसह सोंगणीचे दर गगनाला

सध्या मोसंबीचे भाव गुण वत्तेनुसार ३ हजार ते १४ हजार रुपये प्रति टन आहेत. विविध बाजार अहवालांनुसार काही वेळी १४,००० ते १७,००० रुपये व टन काहीवेळी १३,००० ते २०,००० रुपये प्रति टन असे भाव मिळतात. पावसामुळे मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने मोसंबीचा दर्जा घसरला आहे.

मोंढ्यात दररोज १००-१२० मोसंबीची आवक होत आहे. नवरात्रात मागणी वाढल्यामुळे भावात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र मोसंबीचे भाव वाढले नाहीत.

जालना मोंढ्यातुन बहुतांश माल उत्तरेतील दिल्ली, जयपूर, कोलकत्ता यांसारख्या बाजारात पाठवला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा मिळतो.

अतिवृष्टीमुळे नुकसान

अतिवृष्टीच्या गंभीर संकटामुळे मोठ्या प्रमाणावर मोसंबी फळगळ झाली आहे. बाजारात तुलनेने चांगल्या गुणवत्तेच्या मोसंबीला जास्त भाव मिळताना दिसतो. आगामी दहा ते पंधरा दिवसांनी पिवळा माल कमी होउन हिरवी मोसंबी वाजारात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही प्रमाणात भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादन घटल्यामुळे व बाजारातील अनिश्चिततेमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मोसंबीवर विविध रोग

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या झाडासह मोसंबी फळावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक ठिकाणी फळगळ होत असतांनाच बुरशीचा प्रादुर्भावही झाला आहे. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news