Bribe Case : मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

वाहन पास करण्यासाठी पंचासमक्ष अडीच हजारांची स्वीकारली लाच
Bribe Case
Bribe Case : मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातpudhari photo
Published on
Updated on

Motor vehicle inspector caught in ACB's trap

जालना, पुढारी वृत्तसेवा : ट्रक चालकाकडून अडीच हजारांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील नांदणी येथे गुरुवारी (दि.२५) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोटार वाहन निरीक्षकाला ताब्यात घेतले. वाहन पास करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ याने पंचासमक्ष अडीच हजारांची लाच स्वीकारली.

Bribe Case
Bhokardan Hunger Strike |मंगेश साबळे यांच्या तांडव आंदोलनाने प्रशासन हलले: पाच दिवसांनंतर नारायण लोखंडे यांचे उपोषण सुटले

दरम्यान, तक्रारदार ट्रकचालक असून गुजरात चेन्नईदरम्यान मालवाहतूक करतात. नांदणी येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आरटीओचे चेकपोस्ट आहे. तेथील मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ याने तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेतली. शिवाय परत येताना वाहन पास करण्यासाठी पुन्हा तीन हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी २४ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सापळा लावण्यात आला. या सापळ्यत गुरुवारी (दि. २५) तानाजी धुमाळ यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती अमोल अण्णासाहेब पाटील (वय ५०, रा. अवंतीनगर, शिवाजीनगर सोलापूर) याला नांदणी येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पंचासमक्ष वाहन पास करण्यासाठी अडीच हजारांची लाच स्वीकारताना पकडले. त्याच्याजवळील रोख ११ हजार ८१० रुपये, मोबाईल, दोन अंगठ्या, चेन असा मुद्देमाल जप्त केला. तानाजी धुमाळ यालाही ताब्यात घेण्यात आले.

Bribe Case
Jalna News : बांधकाम कामगारांच्या योजना ठरताहेत दलालांसाठी कुरण

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर, अंमलदार गजानन घायवट, भालचंद्र विनोरकर, गणेश चेके, संदीप लहाने, मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, शिबलिग खुळे, अमोल चेके यांनी केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news