Robbery case : मोसंबी व्यापाऱ्यास तिघांनी लुटले

चंदनझिरा ठाण्यात गुन्हा
Jalna Crime
Robbery Case(File Photo)
Published on
Updated on

जालना : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी येथील मोसंबी खरेदी विक्री करणारे व्यापारी आशपाक बागवान यांना मोसंबी बाग विकायची असल्याचे सांगुन पिरपिंपळगाव येथे बोलावून तीन अनोळखी इसमांनी लुटल्याची घटना घडली.यावेळी आरोपींनी तुमची सुपारी दिली असल्याचेही व्यापाऱ्यास सांगीतले.

या बाबत आशपाक बागवान यांचा मुलगा अर्शद याने चंदनझिरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, त्यांचे वडील आशपाक बागवान हे मोसंबी बाग खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.त्यांच्या मोबाईलवर गेल्या काही दिवसापासुन अनोळखी नंबर वरुन मोसंबी बाग विक्री करावयाची असल्याचा फोन येत होता.

Jalna Crime
Grant scam : अनुदान घोटाळा,महिला तलाठी जेरबंद

मोसंबी बागेची पाहणी करण्यासाठी आशपाक बागवान हे मुलगा अर्शद याच्यासह दुचाकी घेउन लाडसावंगी येथुन मांडवा गवळीवाडी येथे निघाले.यावेळी त्यांना पुन्हा अनोळखी मोबाईलवरुन कॉल आला.यावेळी कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना पिरपिंपळगाव मार्गे येण्याचे सांगीतले.आशपाक बागवान हे सांगीतलेल्या मार्गाने जात असतांना एका व्यक्तीने त्यांना टेकडीजवळ थांबविले.

यावेळी तेथे दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तीनी आशपाक बागवान यांना मारहाण करुन त्यांच्या जवळील पैसे व इतर सामान लुटुन नेले.यावेळी तुमची सुपारी देण्यात आली असल्याचे मारहाण करणाऱ्यांनी सांगीतले. जख्मी आशपाक बागवान यांना जालना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Jalna Crime
Farmers protest against MSEDCL : महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक

तीन जणावर गुन्हा

या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात अर्शद बागवान यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी तीन जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी कृष्णा तंगे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news