'ऑपरेशन यात्री सुरक्षा'मध्ये मोबाईल चोर अटकेत, चार संशयित ताब्यात

रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत कारवाई करत चार संशयित चोरांना ताब्यात घेतले आहे
jalna news
'ऑपरेशन यात्री सुरक्षा'मध्ये मोबाईल चोर अटकेत, चार संशयित ताब्यातfile photo
Published on
Updated on

Mobile thief arrested, four suspects detained in 'Operation Yatri Suraksha'

जालना, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत कारवाई करत चार संशयित चोरांना ताब्यात घेतले आहे. तर परभणी येथे मोबाईल चोरीप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवार, दि. ६ रोजी करण्यात आली.

jalna news
Sambhajinagar Crime News : गावगुंडाने भररस्त्यात पोलिस अधिकाऱ्यावर टाकला हात

दरम्यान, 'ऑपरेशन यात्री सुरक्षा' अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे गुप्तवार्ता शाखा (CIB) आणि सरकारी रेल्वे पोलीस, परभणी यांच्या संयुक्त पथकाने सायबर तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल चोरीप्रकरणातील एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून नोव्हेंबर २०२५ मध्ये गुंटूर एक्सप्रेसमधून चोरीस गेलेला सुमारे १५ हजार ९९९ रुपयांचा सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आला.

याच कारवाईदरम्यान परभणी रेल्वे स्थानकावर नगरसूल-काचीगुडा एक्सप्रेसजवळ प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने त्यांना सरकारी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalna news
Nanded Crime : पोलिसांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास रेल्वे सुरक्षा हेल्पलाईन १३९ वर किंवा जवळच्या रेल्वे सुरक्षा दलाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news