

Matsyodari Devi Yatra begins with Ghatasthapana
अंबड पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण मराठवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मत्स्योदरी देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवार (११) रोजी घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजता तहसीलदार तथा देवस्थानचे अध्यक्ष सोमेश मोहिते व त्यांच्या पत्नी स्नेहल मोहिते यांच्या हस्ते पारंपरिक विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. पुण्यवाचनानंतर देवीचा अभिषेक, आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी 'बोल भवानी की जय !' च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीचा अभिषेक, महापूजा, नैवेद्य, ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद वितरण असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तान्हाजी देशमुख लिखित पारंपरिक काव्याद्वारे देवीची आरती करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
घटस्थापना सोहळ्यास देवस्थानचे विश्वस्त तथा पुजारी गीताविलास खुंटेफळकर, सुहास गुरव, ब्रह्मवृंद संतोष दुधाधारी, यशवंत जोशी, योगेश जोशी गोंदीकर, अनिल देवा जोशी, त्र्यंबक जोशी, राहुल जोशी, संस्कार कुलकर्णी, एकनाथ देवा, अथर्व खुंटेफळकर, प्रकाश मुळे, माधव जोशी, प्रवीण दुधाधारी, वैभव कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, नवनाथ मुळे, योगेश जोशी, दिवाकर जोगलादेवीकर यांच्यासह व्यवस्थापक कैलास शिंदे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी नऊ दिवस मत्सोदरी देवीच्या दर्शनासाठी जालना जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातुन भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. भाविकांची गैरसोय होउ नये यासाठी मंदीर प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदीर परिसरात भाविकांची गर्दी आगामी काही दिवसात
भक्तीमय वातावरण
नवरात्रोत्सवानिमित्त अंबड परिसरात यात्रेची लगबग सुरू झाली असून, विविध वस्तूंची आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, जयघोष आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.