Jalna News : अंबडमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी तासाभरात आटोक्यात

धुराचे लोट अडीच तास कायम; पोलिसांनी जमाव पांगवून वाहतूक सुरळीत केली
Jalna News
Jalna News : अंबडमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी तासाभरात आटोक्यातfile photo
Published on
Updated on

Massive fire in Ambad; With the tireless efforts of the fire brigade, it was brought under control within an hour

जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड शहरात रविवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोट उसळले असून ते जवळपास अडीच तास दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच अंबड नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Jalna News
Jalna News : ऊसतोडीने महिलांचे आरोग्य धोक्यात

आग विझविण्याच्या कामात शहरातील काही नागरिकांनीही पुढाकार घेत खाजगी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. घटनास्थळी हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली २० ते २५ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी पांगवून वाहतुकीची कोंडी दूर केली. सुमारे एक तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

Jalna News
Deer Rescued Jalna | आईपासून बिछडलेल्या हरणाच्या पिल्लाला वन विभागाकडे सुरक्षित सुपूर्द

या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणाची नोंद अंबड पोलिसात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news