Jalna Crime | घरच्यांना मारहाण करून विवाहितेचे अपहरण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

महाकाळा येथील ब्राह्मणाथनगरमधील घटनेने खळबळ
Shahgad  married woman kidnapped
Shahgad married woman kidnappedPudhari
Published on
Updated on

Shahgad married woman kidnapped

शहागड : महाकाळा परिसरातील ब्राह्मणाथनगर येथे १८ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. काही अज्ञातांनी घरच्यांना मारहाण करून एका विवाहित महिलेचे जबरदस्तीने अपहरण केल्याची नोंद आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तीन पुरुषांवर अपहरण, मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिलेने यापूर्वी अमोल दत्तू जाधव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणाची सुनावणी १८ मार्च रोजी न्यायालयात झाली होती. सुनावणीनंतर सायंकाळी घरी परतत असताना अमोल जाधव, सोमनाथ जाधव व इतरांनी संगनमत करून महिलेच्या आजोबाला मारहाण केली आणि तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेले.

Shahgad  married woman kidnapped
Jalna Crime | जांबुवंत देवस्थान जत्रेत दोन महिलांचे मंगळसूत्र लंपास

दरम्यान, आरोपींची कार (एमएच ०४ जीएम ०५३७) शहागड–पैठण मार्गावर बंद पडल्याने पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, मुख्य आरोपी आणि अपहरण झालेली महिला दोघेही अद्याप सापडलेले नाहीत.

पोलिसांनी घटनास्थळावरून बंद पडलेली कार जप्त करून शहागड पोलीस चौकीत ठेवली आहे. या प्रकरणी दत्तू जाधव, सोमनाथ जाधव व दोन महिलांना अटक करण्यात आली असून फरार आरोपी व महिलेच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.

Shahgad  married woman kidnapped
Jalna Crime News : घाणेवाडी पाईपलाईनचे २० फुटी लोखंडी गडर हस्तगत

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आणि तपास जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच गोंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.

या प्रकरणात डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदी पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहे. तरीही मुख्य आरोपी आणि अपहरण झालेली महिला अद्याप हाती लागलेली नाही.

Shahgad  married woman kidnapped
Jalna Crime News : शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

उल्लेखनीय म्हणजे, याआधीही संबंधित आरोपीवर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर असून न्यायालयात साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news