Marathwada rain: टेंभुर्णी मंडळात परतीच्या पावसाचा हाहाकार; कपाशीसह अन्य पिकांचेही मोठे नुकसान

Jalna farmers news: शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे.
Marathwada rain
Marathwada rain
Published on
Updated on

टेंभुर्णी: जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी झालेल्या तुफानी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.

Marathwada rain
Unseasonal Rain Purna | पूर्णा तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ

परतीच्या पावसाने टेंभुर्णी मंडळातील जवळपास शेकडो एकर क्षेत्रातील कपाशी, सोयाबीन, मका आणि तूर या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. तलाठी सजेच्या हद्दीतील सुनीताताई अंभोरे यांच्या गट क्रमांक ४४३ मधील तसेच संतोष शिंदे यांच्या पाच एकर शेतातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दोन शेतकऱ्यांसह संपूर्ण टेंभुर्णी शिवारातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी पुरते चिंताग्रस्त झाले आहेत.

Marathwada rain
Marathwada Latur rain: लातूर जिल्ह्यात पुन्हा 'जलप्रलय'! मुसळधार पावसाने नद्यांना पूर

या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी आणि आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. विनायक ढवळे, सुनिताताई अंभोरे, संतोष शिंदे, भिकनखाँ पठाण, संतोष खाडेभराड, शाम खरात आदी शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही मागणी लावून धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news