

लातूर : पाऊस, अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या नुकसानीतून सावरत असलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पावसाचे मोठे संकट कोसळले आहे. मंगळवारी (दि.२८) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.
धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे, मांजरा आणि रेणा या नद्यांना मोठा पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोठे नुकसान झाले आहे.
मोठ्या मेहनतीने कापणी करून राशीसाठी रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. नुकसानीच्या आघातातून उठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.