पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी एकदिवसीय मौन आज (दि.२२) सकाळी सोडले. माध्यमांशी बोलताना म्हणाले, २४ तारखेपासुन रोज सकाळी १०:३० ते १ वाजेपर्यंच रास्ता रोको आंदाेलन करण्यात येईल. राज्यातील सर्व मराठे आरक्षणाच्या आंदाेलनात सक्रीय आहेत. ३ मार्चला प्रचंड शक्तीशाली रास्तारोको होणार. शांतता आणि एकजुट काय असते हे मराठ्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (Maratha reservation)
गेले काही दिवस मराठा आरक्षण आंदोलन खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२२) घोषणा केली होती की, ते एक दिवसांचे मौन बाळगणार आहेत. बदनामीकारक आरोपानंतर जरांगे-पाटील यांनी ही घोषणा केली. दरम्यान, त्यांनी मौन सोडत आपली भूमिका मांडली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की," ३ मार्चला प्रचंड शक्तीशाली रास्ता रोको होणार. शांतता आणि एकजुट काय असते हे मराठ्यांनी दाखवून द्यावे."
जरांगे यांचे कोअर कमिटीचे सदस्य असलेले अजय बारस्कर महाराज यांनी जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. याला जरांगे पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना म्हणाले की,"बारसकारांच्या मागे एक मंत्री आहे. बारसकरला विकत घेतलं गेलं आहे. बारसकर हा शिंदेंच्या प्रवक्त्याचा ट्रॅप आहे. मी काय केलं आहे ते बारसकरांनी सांगाव. असं म्हणतं त्यांनी बाविसकरांना म्हटंल आहे, "तु नाटकी करो नको, तु संत तुकाराम महाराजांच्याबद्दल आणि माझ्या कुटूंबाबदद्ल काय बोललास तर बघ. तु माझ्यावर काय आरोप करायचे आहेत ते कर; पण माझ्या कुटुंबावर वर आणि तुकाराम महाराज यांच्यावर आरोप करायचे नाहीत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन शांततेत सुरु राहील, असे स्पष्ट करत दररोज दोन टप्प्यात रास्ता रोको आंदोलन होईल. रविवार (दि.२४) पासून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केले जाईल, ३ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन केले जाईल. या पुढील मराठा आरक्षणासाठी केलेले आंदाेलन हे देशातील सर्वात मोठे आंदोलन असेल, अशी माहिती जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.२१) पत्रकार परिषदेत दिली हाेती. (Manoj Jarange appeal For Rasta Roko Movement )
येत्या २४ फेब्रुवारीपासुन (रविवारी) राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करावे
२४ फेब्रवारीपासून दररोज सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान रास्ता राेकाे आंदोलन करावे. ज्यांना ही वेळ जमत नसेल त्यांनी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत करावे.
आंदोलन शांततेत पार पडेल याची काळजी घ्यावी.
आमदारांना गावबंदी नाही, मात्र कोणताही राजकीय नेता दारी आला की दार बंद करावे.
रोज रास्ता रोको आंदोलन करुन सरकारला निवेदने द्यावे.
आंदोलन दरम्यान कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करु नये.
कायदा, आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
मराठा समाजातील सर्व वृद्धांनीही या आंदोलनाला बसावे.
आंदोलनाला बसताना एका रांगेत सर्वांनी उपोषणाला बसावे.
१ मार्च रोजी राज्यभरातील मराठा लोकप्रतिनिधींची बैठक होईल.
३ मार्च राेजी जगातील सर्वात मोठा रास्ता रोको आंदोलन करा.
राज्यात ३ मार्च राेजी सर्व जिल्ह्यात सकाळी १२ ते १ रास्ता राेकाे आंदोलन करावे.
३ मार्चच्या रास्ता रोकाेनंतर मुंबईतील आंदोलनाची दिशा स्पष्ट करु.